Monday, December 29, 2008

प्रेम हे प्रेम असते,

प्रेम हे प्रेम असते,
कधीही ते न सम्पनारे असते,
काही नाती बांधलेली असतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच प्रेम म्हणतात.
प्रेम हे प्रेम असते,
कधीही ते न सम्पनारे असते,
फ़क्त्त ते समजावे लागते,
आणी ते शेवट्पर्यत टीकवावे लागते.
कमल.

मनं माझ तुझसाठी वेडं का......?

मनं माझ तुझसाठी वेडं का......?
मनं माझ तुझसाठी वेडं का......?
आज बरसत्या पावसासवे
हे भंयकर वादळ का ......?
आयुष्यभर तुझ्यासवे जगण्याचस्वप्न
आज असे तुटल का......?
तुझ्या प्रेमला मुकलोय तरी
तु माझीच आहेहा व्यर्थ भास का ......?
पानावरच्या दवासारखी तुझी साथ
जिवनात माझ्या क्षणभंगुर का......?
तु दिलेल्या वेदना मनाच्या प्रत्येक कोप-यात्त पसरल्यावरही
अजुनही हे मन तुझ्यासाठी वेड का......?
तु विसरलीस मला हे माहीत असुनही
माझ हे मन तुझ्या आठवणीत बैचैन का......?
भंगलेल्या स्वप्नालाच पुर्ण करायचयं
हे वेड स्वप्न उराशी बाळगुन का......?
तुझ्या मनापर्यंत पोहोचल्यावरही
माझ्या मनाचा कागद कोरा का......?
जिला माझ्या भावनाच कळल्या ना कधी
तिलाच प्रत्येक शब्दातुन मांडतो का......?
सगळे संपले असतानाही
तु माझीच होशिल हा व्यर्थ भास का......?
नेहमी स्वत:ला तुझ्या डोळ्यात शोधन्याच्या प्रयत्न करणा-या
माझ्या या डोळ्यात आज आसवांची माळ का......?
आयुष्यभर जीवनाच कोडं सोडवणा-याला
आपल्या जिवा ऎवजी त्या कोड्याचच महत्व का......?
तु परत येणार नाही ही जाणिव असतानाही
हा जीव जायचा थांबला का......?
सरणावर झोपल्यावरही मनात मझ्या
तुझ्या सवे जगायची इच्छा का......?
मनं माझ तुझसाठी वेडं का......?

सखे पुन्हा एकवार ..............

सखे पुन्हा एकवार ..............
तु हो म्हणशील तर, एकदा जगावं म्हणतो !
सखे पुन्हा एकवार ! 'तु'ला मागावं म्हणतो !
थकलो सये आता , वाट सरतच नाही ,
ये बैस विसाव्याला ! थोडं बोलावं म्हणतो .
ही नीरव शांतता, कल्लोळ मनात माझ्या,
मांडीवर ठेऊन डोकं ! शांत निजावं म्हणतो.
फिरव केसातुन, हळुवार तुझे हात,
किणकिण बांगड्यांची ! थोडं नादावं म्हणतो.
मारीन हाक तुला, देशिल साद सखे का,
ओरडून दुनियेला ! आज सांगावं म्हणतो.
भावनांशी गल्लत, झाली फारकत मनांची,
फाटक्या आयुष्याला ! जरा सांधावं म्हणतो.
ऊर भरून आला गं, सखे बोलवेना शब्द,
तुझ्या कूशीत शिरुनी ! आता रडावं म्हणतो.
सखे पुन्हा एकवार........ 'तु'ला मागावं म्हणतो...!!!

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती
मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती
तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती
तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती
तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.
नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.
तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती
तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती
आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.
मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती.

Thursday, November 20, 2008

जमवून बघ

जमवून बघजन्माला आला आहेस
थोडं जगून बघ,
जीवनात दु:ख खूप आहे
थोडं सोसून बघ !
चिमूटभर दु:खाने कोसळू नकोस,
दु:खाचे पहाड चढून बघ !
यशाची चव चाखून बघ,
अपयश येतं, निरखून बघ,
डाव मांडणं सोपं असतं,थोडं खेळून बघ !
घरटं बांधणं सोपं असतं,
थोडी मेहनत करुन बघ !
जगणं कठीण असतं, मरणं सोपं असतं,
दोन्हीतल्या वेदना झेलून बघ!
जीणं-मरणं एक कोडं असतं,
जाता-जाता एवढं सोडवून बघ

Wednesday, November 19, 2008

फुलात न्हाली पहाट ओली

फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले नभात
भुकल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले
रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लादबदाले

गालावाराचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले
निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणाकुणाच्या आठवणी

एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी
अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे

दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे
आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुन बोलविले

भरात येउनी नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले
काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले

तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले
फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते

गंधवतीच्या मनात राजस एक पाखरु भिरभिरते!

Friday, September 19, 2008

फुलले रे क्षण माझे फुलले रे

फुलले रे क्षण माझे फुलले रे
मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने,
सजले रे क्षण माझे सजले रे
झुळूक वार्‍याची आली रे
लेऊन कोवळी सोनफूलेसाजण स्पर्शाची जाणिव होऊन,
भाळले मन खुळेया वेडाचे, या वेडाचे,
नाचरे भाव बिलोरेमेंदीने,
शकुनाच्या मेंदीने, खुलले रे
क्षण माझे खुलले रे
ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे
तुझे भांबावल्या माझ्या उरात,
स्पर्शात रेशिम काटे तुझे मनमोराचे,
मनमोराचे, जादूभरे हे पिसारेमेंदीने,
शकुनाच्या मेंदीने, हसले रे क्षण माझे हसले रे
प्रीत ही, प्रीत ही उमजेनाजडला का जीव हा समजेनाकशी सांगू मी,
कशी सांगू मीमाझ्या मनीची कथा रेमेंदीने,
शकुनाच्या मेंदीने, भुलले रे क्षण माझे भुलले रे